मनाच्या कोऱ्या पानांमध्ये
जपुन ठेवलयं तुला फुल म्हणुन...
जरी कोमेजलयं ते
म्हणुन काय झालं...
त्याचा सुगंध दरवळतोय अजुन...
तुझी प्रत्येक आठवण
आहे मनात अशी..
जशी एखाद्या मंदिरी
घंटा वाजत आहे
तिचा सुर ऐकतोय मी दुरून...
संथ पाण्यामध्ये
जसा कुणी दगड फेकावा
तशी तुझी आठवण
उठते ह्या मनात अशी
अन् तशीच तरंगत जाते लहर बनुन...
ना फुल ,ना घंटा ,ना तरंग
कुणीच नाही सांगु शकत
तुझ्या आठवणींचा कसा हा रंग
ते तर फक्त मीच जाणतो
मलाच माहित कसा जातो मी रंगुन...
-- सतिश चौधरी