Author Topic: तु……  (Read 2533 times)

Offline dipakmuthe

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तु……
« on: September 28, 2014, 07:57:53 PM »
हवेच्या प्रत्येक झुळके सोबत आठवण तुझी येते
नदीच्या प्रवाहां सारखे मन माझे धावू लागते
इथ तिथ मग ते तुलाच पाहू लागते
शब्दांविन ओठांवर अलगद गाणे येवू लागते
मन आनंदाने वेडावून ग जाते
स्वप्नांच्या दुनियेतही ते तुलाच शोधत राहते
भेटीच्या तव आतुरतेने ते वेडेपिसे होते
ये प्रिये लवकर उमलुदे आपुल्या
नात्याची कळी अन
दिसुदे तुझ्या गालावरची ती मोहक खळी
दिपक मुठे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: तु……
« Reply #1 on: October 01, 2014, 01:56:44 PM »
surekh.. dipakji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]