Author Topic: फुटा फूटी  (Read 794 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
फुटा फूटी
« on: September 29, 2014, 08:48:19 PM »
                  फुटा फूटी
काल होते एकत्र आज त्यांची फुटा फूटी
स्वार्थासाठी, यांची आघाडी, त्यांची युती
किती असावा स्वार्थ? गुंग होते आपली मती
कुणी एका तपात,कुणी दोन तपात कालवली माती
कसला त्याग? कसली अस्मिता?कशास फुगवावी छाती?
समजून घ्या उभयता सारे आहे जनता-जनार्दना हाती
   स्वार्थासाठीच का करावी सोंग? टिकवावी नाती
   खुर्ची साठीच का गाळावा घाम,तुमचे भविष्य  खर्चावी शक्ती ?
   कुठे आहे पक्ष निष्ठा?कुठे आहे साम्यक नीती ?
   खोट्या आणा ,खोट्या शपथा,व्यर्थ आहे अशी भक्ती
   कदाचित खुर्ची मिळेलही पण कुठवर चालेल तिच युक्ती ?
   युवक आत्ता जागा झालाय  तुमचे भविष्य त्यांच्याच हाती
थांबवा हि सोंग नका लढू केवळ खुर्चीसाठी
प्रश्न अनेक आहेत एक व्हा ते संपवण्यासाठी
संपवा मेळघाटची भूक,संपवा गडचिरोलीचा अंधार
एकजुट करून मांडा उद्योग ,द्या बेरोजगारांना आधार
थांबवा हि पक्ष फोडी ,थांबवा पैशांचा अन मतांचा व्यापार
सारे जग पाहते ,द्या भारत भूमीला चैतन्यमय आकार 
मंगेश कोचरेकर
           
     
   

Marathi Kavita : मराठी कविता