Author Topic: असं प्रेम करावं...  (Read 4813 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
असं प्रेम करावं...
« on: October 01, 2014, 08:39:56 PM »
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
 थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
 गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अगं" चा "अरे" करावं
 असं प्रेम करावं जग पुढे चाललं असलं
 तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
 मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं जावं
 असं प्रेम करावं विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं❤ p.p.p❤
     
         

Marathi Kavita : मराठी कविता


Ajay Ganekar

  • Guest
Re: असं प्रेम करावं...
« Reply #1 on: January 13, 2015, 02:31:44 PM »
असं प्रेम करावं