Author Topic: त्यांच्यासाठीच अता आपण लिहाव...  (Read 1217 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
तिला म्हटलेले की
पुढच्या वेळी तुझे अश्रु मला दे
मी काहीतरी जादू नक्कीच करीन
जश्या पणत्या साईंनि लावल्या
स्वताचा आत्मा तरी नक्कीच उजळविन
पण जे आधीच वाहिले त्यांच काय झाल
माझी अपेक्षा नाही की
फ़क्त ह्या साठी तिने रडाव
म्हणून म्हटल जे वाहून गेले
त्यांच्यासाठीच अता आपण लिहाव
त्यांच्यासाठीच अता आपण लिहाव...

.... अंकुश नवघरे
(स्वलिखित) रात्रो.. ९.४७. ०७.१०.२०१४