Author Topic: ती आली सकाळीच ।  (Read 1416 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
ती आली सकाळीच ।
« on: October 22, 2014, 11:12:12 AM »
ती आली कशी सकाळीच कळलंच नाही
दरवळ तिचा पसरला घरभर कळलंच नाही

सहज ओले केस तिने सोडले चेहऱ्यावर
कधी घामाने भिजलो कळलंच नाही

गंध तिच्या मोगऱ्याचा दुलईला लागला
स्पंदनांची गती वाढली आणि पूर्ववत
झाली कशी कळलंच नाही

सुमित 9867686957..

Marathi Kavita : मराठी कविता