Author Topic: ती नक्की येईल माहितीये मला ...  (Read 2652 times)

Offline सुमित

 • Newbie
 • *
 • Posts: 25
ती नक्की येईल माहितीये मला
तिला आता राग आलाय पण ती नक्की येईल ..

खूप खूप रडली होती ती जातांना
तुही रडशील म्हणाली होती मी नसताना
नाही सांगू शकलो एक गोष्ट मी तिला
ती निघताना ...पण ती नक्की येईल ..

खूप खूप छान दिसायची ती लाजताना
दोन्ही गालावर खळ्या असायच्या ती हसताना
नाही सांगू शकलो जग आहेस तू माझ
तिच्या घाऱ्या  डोळ्यात बघताना ...पण ती नक्की येईल ..

एकेक दीर्घ श्वास घ्यायची ती जवळ असताना
झटकन हात सोडायची आजूबाजूला कुणी असताना
नाही विचारू शकलो कसा जगू तुझ्याविना
हे तिला बोलताना ..पण ती नक्की येईल ..

एक छोटास कौलारू घर, अंगणात प्राजक्ताचा सडा
फाटकावर चमेलीचा वेल आणि पडवीत एक गोंडस कुत्रा मोती
अंगणाच्या एका कोपऱ्यात रातराणी अन
दुसऱ्या कोपऱ्यात अबोली ....
हे सर्व तिला आवडत ना म्हणून ती येईल

डोळे भरून येतील तिचे हे सर्व बघताना
खूप प्रेम करते तुझ्यावर म्हणेल ती मिठीत शिरताना
नाहीच सांगणार तिला किती खस्ता खाल्ल्यात
हे सर्व जमवताना .... म्हणूनच खात्री आहे
ती नक्की येईल ..

सुमित 9867686957

Marathi Kavita : मराठी कविता


Mahesh kadam

 • Guest
भूतकाळ
कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात
नाही
डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर
डोळ्यातले पाणी संपत नाही
पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर
लक्षात येत.....mahesh
जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन
उभ असत
सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत
जेव्हा त्याच्या हातात हात घालून
कोणी दुसर उभ असत
भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही
मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच
नाहीत
राग कितीही असला तरी आज
प्रेमही मनात येत
कधीतरी चुकून वाटत की आपलच
काहीतरी चुकल
हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो
मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल हे काचेच
घर
क्षणात तोडून मोकळा होतो ...

Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
 • Gender: Female
Re: ती नक्की येईल माहितीये मला ...
« Reply #2 on: November 06, 2014, 11:10:45 AM »
Ho nakki yeyil ti......god bless u! Really nice poem.

Offline WithOutYouStory

 • Newbie
 • *
 • Posts: 2
  • บาคาร่า
Re: ती नक्की येईल माहितीये मला ...
« Reply #3 on: November 07, 2014, 02:06:36 PM »
Great to hear that our request maybe implemented in next release!Any idea when it will be?