Author Topic: खरंच कीती छान होते ते दिवस...  (Read 2669 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
 खरंच कीती छान होते ते दिवस
जणू स्पर्धाच असायची भावनांची

एक कटाक्ष मिळावा तिचा म्हणून
तासनतास मी वाट पहायची
हसेल ती गालात बघून कधीतरी
सवयच जडली या भ्रमात राहायची

वाटावं तिला हुशार आहे म्हणून
उगाच मी हात वर करायचा
आणि खूप मार खायचा तरी
वेदनांची झळ तिच्या डोळ्यात दिसायची

बोलाव भेटाव मी तिला म्हणून
पत्र बाजूच्या दुकानावर पाठवायची
"प्रिय" हा पहिलाच शब्द दोनदा खोडायची
नको असतानाही त्यानंतर "मित्र" लिहायची

लवकर विचारावा तो प्रश्न मी म्हणून
स्थळ येताहेत बघायला म्हणायची
मी निरुत्तर मग ढसाढसा रडायची
रेघ अश्रुची माझ्या तिच्याही गाली असायची

नाईलाज आणि दु:खाच्या भावनांची मग
मस्त झुंबड उडायची ....

सुमित 9867686957

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: खरंच कीती छान होते ते दिवस...
« Reply #1 on: November 01, 2014, 04:34:39 PM »
 :) :) :)