Author Topic: प्रेमदेवता  (Read 967 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
प्रेमदेवता
« on: November 05, 2014, 08:25:55 PM »


खूप दिवसांनी
भाग्य विनटला
दिस खरोखर
कारणी लागला

खूप दिवसांनी
पाहिले सखीला
अन चैन माझ्या 
जीवास पडला

तोवर उगाच
पाहत वाटेला     
तसल्ली दिधली     
व्याकूळ जीवाला

भाग्य बरसले
सुख उमलले
प्रसन्न जाहले
मन कोमेजले

तसे मना तर
ओढ लागुनी
बसलोच होतो 
उदास होवुनी

जणू तप तेच     
होवून पूर्णता
अवतरली ती
श्री प्रेमदेवता

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: November 06, 2014, 12:12:35 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता