Author Topic: छान वाटेल मला  (Read 2018 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
छान वाटेल मला
« on: November 11, 2014, 10:18:59 PM »
छान वाटेल तेव्हा मला,
जेव्हा तु मला विसरुन आनंदी राहशील.
थोड माझ्यातुन बाहेर पडून स्वत:च अस्तित्व तयार करशील.
मलाही आनंदच होईल,
जेव्हा माझ्याशी तुझी तुलना करुन सत्य स्विकारशील.
तेव्हा आवडेल मला, जेव्हा तु
माझा विचार करणं सोडून देऊन तुझ्या मनात घुसशील.
तेव्हा राग नाहीच येणार ग,
जेव्हा माझ्या ह्रदयातुन बाहेर पडून स्वत:ला बळकट करशील.
तेव्हा खुप असेल ग मी,
जेव्हा तु ही भयानक स्वप्ने विसरुन
तुझ्या सुंदर आयुष्यात जाशील.

Marathi Kavita : मराठी कविता