Author Topic: उशीर  (Read 1229 times)

Offline drapkulkarni

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
उशीर
« on: November 14, 2014, 08:17:01 PM »
उशीर

तीही समीप होती, पुनवेस चांदराती
अन बात छेडण्याची, फक्त देर होती
*
नक्षत्र पाहतांना, थोडीच रेलली ती
आधार द्यावयाची, फक्त देर होती
*
ठावे मलाही होते, अनभिद्न्य तीही नव्हती
शब्दात सांगण्याची, फक्त देर होती
*
आतूर भावनाही येऊन दाविते ती
डोळ्यात वाचण्याची, फक्त देर होती
*
तिसरे कुणीही नव्हते, दोघात रात होती
वाटून घ्यावयाची, फक्त देर होती
*
गेल्या अशाच राती, कां दूर राहते ती?
सर्वास कारणेही, फक्त देर होती
-अशोक

Marathi Kavita : मराठी कविता

उशीर
« on: November 14, 2014, 08:17:01 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):