Author Topic: नको रे नको मना  (Read 1039 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
नको रे नको मना
« on: November 19, 2014, 12:21:42 AM »
नको रे नको मना
प्रेमात पाडू तु पुन्हा या मना

प्रेम करने होईल हा गुन्हा
आणून सोडेल वादळात पुन्हा

झाला होता एकदा तोच गुन्हा
नाही करायचा तोच पुन्हा

प्रेमात पडून करतो मना आपणच गुन्हा
म्हणतो नंतर स्वतःच सावर रे मना पुन्हा

पटणारा नसतो काहींना आपला प्रेम हा गुन्हा
दुर लोटतील दोघांनाही एकमेकांपासून पुन्हा

भावभावकीत मांडला जाईल प्रेम हा गुन्हा
बदनामी चारचौघात मायबापाची पुन्हा

नकोच नको करायला हा गुन्हा
सोसवणार नाही हे सर्व पुन्हा

नको रे नको मना
 . . नको रे नको मना .

ऐश्वर्या सोनवणे - मुंबई

Marathi Kavita : मराठी कविता


Suraj sawant

  • Guest
माझी परी
« Reply #1 on: November 19, 2014, 01:28:51 PM »
माझी परी
         
भर उन्हाच्या रस्त्यावरुनी चालत गेलो..,
जाता जाता हळुच मनात परी म्हणालो.

हवेची मंद झुळूक हळूच सांगुन गेली ..
तुझ्या परीची चाहुल तुला वेड लावूनी गेली..

कधी मनात हळुच म्हणतो प्रेम आहे तु माझ.,.
प्रत्यक्षात मी साध्य करतो जीवन आहेस तु माझ....

तुझे सुंदर रुप मला  माझ्या  परीमध्ये सापडले ...
नेहमीच मला योग्य वेळी तुझा बच्चु होणे आवङले
        सुरज सावंत
           मुंबई