Author Topic: प्रेम असते तरी काय  (Read 1690 times)

Offline savita tajane

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेम असते तरी काय
« on: November 19, 2014, 10:34:33 PM »
प्रेम एक शब्द दोन अक्षरी
प्रेम माणुसकी दूसरी
प्रेमाची वाट स्वरगावरी
प्रेम आत्म्याचा वारकरी
प्रेम करणे कला जरी
टिकवने ही साधना खरी
फुला पेक्षा कोमल प्रेम जरी
प्रेमाने जाई अहंकार दुरी
प्रेम सुहासित पुष्प जरी
विकत मिळत नाही ते बाजारी
ज्या प्रेमात पवित्रता खरी
तेच मन शांत करी
व्याकुळ करी मनाला क्षण भरी
               ___सविता ताजणे

Marathi Kavita : मराठी कविता