तुझं नि माझं नातं
आळवावरच्या पाण्यासारख
एकमेकासोबत सुंदर दिसणारं
पण एकजीव न होणारं
क्षणाच्या भेटीतही खूप आनंदवणार............
प्रेमाची ओढ न भेटण्याची आस…
जशी लाट किनाऱ्याला भेटून जाते
किनाऱ्याला ही वाटत कि
लाटेला सामावून घ्यावं.............
तुझं नि माझं नातं
स्वप्नांच्या पलीकडच न
सत्याच्या अलीकडच
कधीच न तुटण्यासाठी
न बिखरण्यासाठी...........
हो,असंच आपलं नातं असाव
मी गावे तू गुणगुणाव
भावनांना असेच जपाव............
- राधा फुलवडे