Author Topic: काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..  (Read 3271 times)

Offline suyog54

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस

निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!
 :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline asawari

 • Newbie
 • *
 • Posts: 28

Offline rupa_80

 • Newbie
 • *
 • Posts: 19
chan aahe    :)    :)

deshpande Arpita

 • Guest