Author Topic: तू....  (Read 2556 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,257
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
तू....
« on: November 20, 2014, 11:16:14 PM »
तू....

हसण्यात हळूच साऱ्या प्रश्नांची 
उत्तरे माझी समजलास तू,
विचार काय आता ह्वेते
हास्य माझे जाणतोस तू!

जरी झाले ओठ मुके
डोळ्यात प्रेम भाव दाटलेला,
विसरतोस तू प्रिया कसा
जीव माझा तुजवर जडलेला!

बहाणे सारे तुझे वेडे
मनाला ह्या अलगद छळणारे,
भूल पडे नजरेला माझ्या
नकळत तयात मला गुंतविणारे!

© शिवाजी सांगळे[/size]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: तू....
« Reply #1 on: November 22, 2014, 03:29:17 PM »
खूप सुदंर सर...जर आज सजंय सर आपल्यात असले असते तर खूप बरं झालं असतं...!

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,257
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: तू....
« Reply #2 on: November 23, 2014, 06:57:30 PM »
स्वप्निल धन्यवाद। मी संजय यांचा संदर्भ समजलो नाही।