मला असे का वाटते...
कि आजचा दिवस कधीतरी जगलो आहे,
अन परिणामांची फळे भोगलो आहे,
माझ्याविषयीच असं घडतं का ?
कि दिवसा ढवळ्या मला स्वप्न पडलं आहे...
मला असे का वाटते...
कि आज ती मला भेटणार आहे,
अन प्रेमाची साद मला देणार आहे,
माझ्याशी ती काही पुटपुटणार आहे का ?
कि दिवसा ढवळ्या मला स्वप्न पडलं आहे...
मला असे का वाटते...
कि आज सोबतिनं मी तिच्या चालणार आहे,
अन हातात हात घेऊन फिरणार आहे,
मला असे भास होतात का ?
कि दिवसा ढवळ्या मला स्वप्न पडलं आहे...
मला असे का वाटते...
कि आज हृदयाला हृदयाची टक्कर होणार आहे,
अन स्पंदनांची एकजुट होणार आहे,
हा सुखद धक्का खरंच मिळणार आहे का ?
कि दिवसा ढवळ्या मला स्वप्न पडलं आहे...
Thanks to visit and like my FB page.
प्रमोद पवार.
©pramod pawar