Author Topic: तुझ्यासाठी जन्मसारा  (Read 2180 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तुझ्यासाठी जन्मसारा
« on: November 24, 2014, 07:01:59 PM »
सखी माझी प्रीत आहे
रानातील वेडे गाणे
पानोपानी चैतन्याचे
कणोकणी बहरणे
 
वेडे खुळे झाड थोडे
रुपाकडे पाहू नको
छाया फुले बरसती
दूरवर जावू नको

सारे काही तुझ्यासाठी
मन खुळे रानफुले
तुझ्यासाठी अंथरले
हृदयही दव ओले
 
सजूनिया आला ऋतू
किती काळ ठाव नाही
तुझ्यासाठी जन्मसारा
तुझ्यासाठी मरणही

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: November 27, 2014, 10:56:23 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता