Author Topic: ॥एक क्षण प्रेमाचा॥  (Read 2305 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
॥एक क्षण प्रेमाचा॥
« on: November 29, 2014, 01:34:16 PM »
॥एक क्षण प्रेमाचा॥

एक क्षण प्रेमाचा
देण्याचा नि घेण्याचा
ओठावरच्या गाण्याला
नवे सुर देण्याचा ॥

एक क्षण प्रेमाचा
आठवणीत रमण्याचा
गतकाळातील स्मृतिँना
नवा उजाळा देण्याचा ॥

एक क्षण प्रेमाचा
वसंताच्या उत्साहाचा
गरगळलेल्या मनाला
नवपल्लवीत करण्याचा ॥

एक क्षण प्रेमाचा
भावबंध जुळण्याचा
जुळलेल्या नात्यासंगे
एकरुप होण्याचा ॥

एक क्षण प्रेमाचा
कृतज्ञता अनुभवण्याचा
कृतकृत्य डोळ्यामध्ये
कृतार्थता पाहण्याचा ॥

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता