Author Topic: त्याला आवडायच म्हणून ......  (Read 2222 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
त्याला आवडायच म्हणून ......
« on: November 29, 2014, 11:48:20 PM »

त्याला आवडायच म्हणून
कपाळी टिकली मी लावायची
मग तासनतास तो माझ्या चेहर्याकडेच पाहायचा

त्याला आवडायच म्हणून........
साडी मी नेसायची
मग किती तरी वेळ तो नुसत मलाच न्याहाळायचा

त्याला आवडायच म्हणून.......
नाकात नथ मी घालायची
मग माझ्या चेहर्याकडे तो खूपच बाराकाइने पाहत गालातल्या गालात गोड हसतच बसायचा

त्याला आवडायच म्हणून........
लांब केस मी मोकळे सोडायची
मग खूप वेळ तो माझ्या केसांतच गुंतून राहायचा

त्याला आवडायच म्हणून.......
गजरा मी माळायची
मग फार वेळ तो त्या सुगंधातच हरवून जायचा

त्याला आवडायच म्हणून......
बांगड्या मी घालायची
मग खूप वेळ तो होणारा छुनछुनाट ऐकतच बसायचा

त्याला आवडायच म्हणून......
पायी पैंजण मी घालायची
मग किणकीणार्या त्या आवाजात तो गुंगूनच जायचा

त्याला आवडायचे म्हणून.......
श्रुंगार मी हा करायची
फक्त त्याला आवडायच म्हणून मी त्याच्यसाठीच सजायची

      Aishwarya Sonavane.
              MUMBAI

Marathi Kavita : मराठी कविता