Author Topic: प्रेमवीर मी भाबडा  (Read 1161 times)

Offline kasturidevrukhkar

  • Newbie
  • *
  • Posts: 22
प्रेमवीर मी भाबडा
« on: December 02, 2014, 10:50:16 AM »
काहीही झाले तरी रूसणे ,
हा जणू  तुझा  छंद आहे.....
कठोर तुझ्या शब्दांमध्ये देखिल
लपलेला प्रेमाचा मृदगंध आहे. ....
लतकी तुझी नजर ,भुलवते मला. ..
तू रूसल्यावर तुला मनवण्याचा,
नाद जडलाय जीवा. ......
चंद्र ,तारे, मी नाही माळू  शकत
ते जमणार नाही मला. .......
तुझ्यासाठी गीत ओठी गाईन
प्रेमवीर मी भाबडा. ...........
मग,  तुझ्या मुखकमलावर लकेर उठेल हास्याची,
होईन  मी मजनू  तुझा ,तुच अप्सरा माझी. .........
         
                       - सौ.  कस्तुरी कुणाल देवरुखकर.

Marathi Kavita : मराठी कविता