Author Topic: पडलो मी पथा तुझ्या खरा  (Read 832 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
पडलो मी पथा तुझ्या खरा
« on: December 02, 2014, 08:59:57 PM »
विरताच मेघ
दिसले आकाश
दाटला प्रकाश
सभोवार ||१||
उतरले ओझे
साचले मनात
जरी ना माहीत
पुढे काय ||२||
थोडी जीवनाने
दिली मज आशा
प्राणात पिपासा
संजीवक || ३||
कुणाच्या हळव्या 
शब्दातील ओल
हृदयात खोल
अंकुरले || ४||
उगे थोडेसेच
हवे आहे जिणे
प्राणांचे पेटणे
खरेखुरे ||५||
आणि काय मागू
तुजला मी आता
तुजवीण चित्ता
थारा नाही ||६||
सांभाळ अथवा
नाकार सर्वथा
पडलो मी पथा
तुझ्या खरा ||७||

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: December 05, 2014, 10:34:24 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता