Author Topic: आजही मला पुन्हा एकदा तुझ्यावरच प्रेम व्हावे..  (Read 8772 times)

Offline Shubham Vhaval

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male
पंख फुटावेत मनाला पुन्हा
उडत तुझ्याकडेच यावे
विरहाचे दुःख नको आता
तुझ्यातच सामावून जावे

डोळे भरुनि येवोत पुन्हा
जेव्हा एकमेकांस बघावे
ते जुने गुलाबी क्षण
पुन्हा आठवणीत यावे

कंठ दाटूनि येवो पुन्हा
बोलणेही कठिण बनावे
डोळ्यांमधूनिच एकमेकांशी
बोल प्रेमाचे बोलावे

रोमांच अंगावर येवो पुन्हा
जेव्हा स्पर्श तुझा घडावा
तो प्रेमाचा नाजूक धागा
पुन्हा एकदा घट्ट व्हावा

शब्दही पडावेत अपुरे पुन्हा
असे बोलणे व्हावे
दोघांनी पुन्हा प्रेमाचे ते
शब्द अनंत बोलावे

एकटा पडलेल्या मला आज
पुन्हा एकदा प्रेम व्हावे
पण आजही मला पुन्हा एकदा
तुझ्यावरच प्रेम व्हावे,
अन् तुझ्यावरच प्रेम व्हावे...

                                     -शुभम

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Female

Offline Shubham Vhaval

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male

Offline shrikant.pohare

 • Newbie
 • *
 • Posts: 41
 • Gender: Male
 • कविता करण शिकायचं आहे ...
Its really awesom..... Completely linked up wordings

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!

Offline Shubham Vhaval

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male
Thanks shrikant and milind...

Pradeep Ubale

 • Guest
Mast kavita ahe, it's called true love

sadhana dhole

 • Guest
वेड लावलयस तू मला...
का कोण जाणे तुला पाहताना
हरवतो स्वताला
पाहतच राहतो एकटक
तुझ्यात साठवतो स्वताला
वेड लावलयस तू मला...
ती ओढ़ अनामिक आहे
कधी येते कधी जाते
काहीच कळत नाहिये मला
काय होतेय मला
वेड लावलयस तू मला...
धुंदी मनाला बेधुन्दी श्वासाला
ताल राहत नाही कशाला
रोखता येत नाही किंचित
खालीवर होणार्या ह्या हृदयाला
वेड लावलयस तू मला...
परत परत आठवतो
अपल्यातला सहवास
परत परत जगतो
भुताकाळातला क्षण ख़ास
आतातर नुसते चित्र पाहिले तरी
वेड्यासारखे व्हायला होते मला
वेड लावलयस तू मला...
वेड लावलयस तू मला....

Offline Shubham Vhaval

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male