Author Topic: ती दिसताच मन मोहरून जात माझं…  (Read 1597 times)

Offline Kaustubh P. Wadate.

  • Newbie
  • *
  • Posts: 12
ती दिसताच मन मोहरून जात माझं…

ती दिसताच मन मोहरून जात माझं,
ती मजकडे बघताच ऐकू येतो सुरांचा साज,
ती दिसताच मन मोहरून जात माझं.

ती दूर असली तरी माझ्या आठवणीतून जवळ असते,
स्वप्नांच्या स्वर्गात ती रोज मला भेटते,
ती तरंगते माझ्या मनात जसे पाण्यावरील जहाज,
ती दिसताच मन मोहरून जात माझं.

ती सोबत असताना सुटतो हा गार-उधाण वारा,
तिच्या समवेत खुलतो हा निसर्ग सारा,
ती लांब असली तरी तिच्या चाहुलीच येतो आवाज,
ती दिसताच मन मोहरून जात माझं.

चिंब भिजते ती या लहरी पावसात,
वाहत जाते ती या किनारी सागरात,
ओढत नेउनि मला म्हणते माझ्यासोबत पावसात भिज,
ती दिसताच मन मोहरून जात माझं.

खूप छान ते तीच गालातच हासणं,
पावसाचे पडताच थेंब चेहऱ्यावर तीचं हळूच लाजणं,
गहिवरलो तिच्या प्रेमात मन उडाले आज,
ती दिसताच मन मोहरून जात माझं.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shubham Vhaval

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
Kavita mast ahe pn shabdan waril pakad ajun changli karavi lagel... all the best...