Author Topic: कल्पवृक्ष  (Read 830 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
कल्पवृक्ष
« on: December 09, 2014, 05:02:51 PM »
काळाला कुणीच नाही शकत रेटू
चला.......आज तरी प्रेमाने भेटू !

उण्या-दुण्यातच गेला कालचा काल
चला.....आज तरी मीठीत विसावू !

न जाणो केव्हा घडेल पूनर्भेट
चला...आज तरी संगती राहू !

नात्यांना जाईल केव्हा तडा न कळे
चला....आज तरी माणूस होवू !

उद्या जायचेच आहे खांद्यावर
चला....आज तरी चालत जावू !

मिसळायचेच आहे जर मातीत
चला....आज तरी कल्पवृक्ष होवू !

*अनिल सा.राऊत *
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता