Author Topic: का तुझी ओढ इतकी राणी कळत नाही ...  (Read 1565 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
का तुझी ओढ इतकी राणी कळत नाही
का तुझ्या आठवणीनेही मन भरत नाही ...

तुझा मंजुळ आवाज हृदयापलीकडे जातो
तरी ऐकण्याची तृष्णा मात्र भागत नाही ...

प्रत्येक श्वासागणिक तू जवळ येत आहेस
तरी मन माझ विचारण्यास धजत नाही ...

मनचक्षूंनी तुला नखशिखांत पाहिलंय
तरी डोळ्यांनी बघण्याची इच्छा जात नाही ...

नेईन म्हणतो तुला क्षितीजापलीकडे
पण अंतर आपल्या दोघातलं सरत नाही ...

सुमित 9867686957