Author Topic: कशी ती असेल.....  (Read 2043 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
कशी ती असेल.....
« on: December 11, 2014, 02:42:05 AM »
कशी ती असेल.....

खरच....
माहित नाही कशी ती असेल,
पण जशी असेल...
माझा उरलेला आयुष्यातील,
प्रत्यक क्षण तिच्यासाठीच असेल....

खरच...
माहित नाही,
कधी मला दिसेल...
कधी येईल जवळ अन,
प्रेमान मला बीलगेल....

नसली कोणी ओळखिची.. तर,
अनोळखी ती असेल ...
तशीही काही नसली तर,
नक्कीच स्वप्न परी ती असेल...

जिच्या येण्याण सार काहि,
जणू नव्या सारख दिसेल .....
क्षण दुख्खाचे असुनही तेंव्हा,
आनंद मला भासेल......
         
खरच माहित नाही,
कशी ती असेल........
       
         विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: कशी ती असेल.....
« Reply #1 on: December 19, 2014, 05:40:22 PM »
Chan, milel nakki
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]