Author Topic: मेव्हुणी  (Read 1525 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
मेव्हुणी
« on: December 13, 2014, 08:54:41 PM »
सगळ्यांनाच असते
ओढ मेव्हुणीची....
कारण ती असते
बहीण बायकोची !
जमानाच आहे
एकावर एक फ्री चा....
केळी ती केळी अन्
फुकटात सालीचा !
आपली आवड बायकोला
कधीच कळत नाही....
मेव्हुणी माञ तिच्याएवढे
कधीच छळत नाही!
बायकोने बायकोसारखे
रहावे वाटते...
मेव्हुणीने माञ
खोडकर असावे वाटते !
कधी कधी बायको
मेव्हुणीला रागावते....
आपल्याला माञ
बायकोचाच राग येतो !
बायको खेटून बसली कि
थोडी उतावीळ वाटते....
मेव्हुणी नाही दिसली तरी
जीवाला तळमळ वाटते !
आपले मन मेव्हुणीला
चांगलेच कळते....
बायकोच्या मनात माञ
नाही नाही ते येते !
जेव्हा मेव्हणीचे
लग्न होते...
एक सच्ची
मैञिण दुरावते !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता