Author Topic: का बरं अस होत  (Read 1758 times)

Offline pankaj8590

  • Newbie
  • *
  • Posts: 3
का बरं अस होत
« on: December 15, 2014, 09:01:53 PM »
का बरं अस होत
खर प्रेम करणार्यांच् नेहमीच का फसं होत


ती मला नेहमी बसस्टॉप वर दिसायची,
मला बघुन कधी हलकेच हसायची,
तीच दिसण तीच हसण मला वेड लावून जायच,
अन ती निघुन गेली की सर्व जगच पालटून जायच....

तरी ऐक वेडी आशा असायची की उद्या ती पुन्हा दिसेल,
वरवरच का असेना पण मला बघुन गोड़ हसेल,
तिच्या नुसत्या दिसण्याने माझं मन हरपुन जायच,
अन माझ्या मनातील गुपित मात्र माझ्या मनातच रहायचं....


माझ्या मनातील सुरांना शब्दांची साथ हवी होती,
मला तिच्याशी जोडणारी एक रेशिमगाठ हवी होती,
पण माझ्या मनातील शब्दांचा पाझर ओठान्तुन कधी फुटलाच नाही,
आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा हा भाबड़ा जिव तिला कधी कळलाच नाही....


आणि मग अचानक एक दिवस तीच बसस्टॉप वर येण थांबल,
माझ्या आयुष्याच् गणित मग पुनः एकदा लांबल,
दिवस गेले महीने गेले ती मला परत कधीच नाही दिसली,
अन माझ्या प्रेमाची ही कविता पुन्हा एकदा फसली....

का बरं अस होत
खर प्रेम करणार्यांच् नेहमीच का फसं होत..

-पंकज जाधव

Marathi Kavita : मराठी कविता