Author Topic: सावळ्याची सखी  (Read 848 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
सावळ्याची सखी
« on: December 18, 2014, 10:53:04 PM »
सावळ्याची सखी
सावळी सावळी
उष्ण तप्त मनी
जणू की साऊली

येई पुन्हा अशी
नको शंका मनी
प्राण तुझ्या पदी
मी गं अंथरुनी
 
गूढ डोळे तुझे
भाव नच कळे
देई जन्म मला
वा वध शामले

तुज वाचून हा
जन्म नको मला
वाट पाहू किती
प्राण व्याकुळला

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: December 21, 2014, 12:59:54 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता