Author Topic: आई थोर तुझे उपकार  (Read 1257 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
आई थोर तुझे उपकार
« on: December 20, 2014, 10:55:05 PM »
आई थोर तुझे उपकार
सात जन्मी ही नाही विसरणार ॥

जन्म दिला तू जग दावियेले
प्रेमभरे मला वाढविले
तळहातावरि तू खेळविले
अंगाई गीताचे स्वर आळविले
ते स्वर तव ह्रदयीचे मी कसे विसरणार ॥

हट्ट कधि मी केला असेल
रुसवा फुगवा धरला असेल
भांडणतंटा करुन कधि मी
मनस्ताप तुज दिधला असेल
सर्व गुन्हे मम माफ करुनि प्रेमच वर्षावणार ॥

जगण्याचा तू धडा शिकविला
चालण्याचा तू मार्ग दाविला
पराभवाची कसली मज तमा
हात पाठीवरी असता सदा
प्रेम वात्सल्याचे ते दिन मी कधि न विसरणार ॥

हिच प्रार्थना ईश्वरचरणी
पावन पवित्र आजच्या दिनी
दे आयु आरोग्य तिजला निरामय
पाहु दे आपल्या कष्टाचे तिज फळ
प्रभू तुजकडे जीवनी माझ्या हेच एक मागणार ॥

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Sahil Nahanale

  • Guest
Re: आई थोर तुझे उपकार
« Reply #1 on: December 21, 2014, 11:12:04 AM »
nice