Author Topic: मन मेलं कि काय?  (Read 1394 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
मन मेलं कि काय?
« on: December 21, 2014, 04:26:51 PM »
दरवर्षी पाऊस आल्यावर
भरुन येणारं मन
यावर्षी रिकामच वाटलं...

मन मेलं कि काय?
म्हणून फुंकर घालून बघितली
तर ज्वालामुखी बाहेर यावा
तसं बरंच काही बाहेर आलं...

तो उद्रेक पाहून काळीज चर्रऽऽर्र झालं
मनाचं झालेलं मातेरं पाहताना
डोळ्यांचा विश्वासच बसेना
वेडे डोळे ह्रदयाला आजही देताहेत आश्वासन
कुणी आपलं भेटेल याचं!

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता