Author Topic: सोबत  (Read 2171 times)

Offline varsh

 • Newbie
 • *
 • Posts: 3
सोबत
« on: December 22, 2014, 10:48:59 AM »
आठवांचा थवा तुझ्या, मनात घिरटी भरतो,
मनसोक्त मजला छळतो, नि आसमंती विरतो...

पावलांचा ठसा तुझ्या, नकळत ओला होतो,
थेंब एकच दवाचा, हिरावुन त्यास नेतो...

पौषाचा हा वारा तुझ्या, गंधात पुरता भिजतो,
गारठ्याची रात्र हवीशी, उगाच जागी करतो...

सुचणारा शब्द तुझ्या, असण्याला अर्थ देतो,
सोबतीचे क्षण दोन, कानात सांगून जातो...!

~वर्षा
 
« Last Edit: December 22, 2014, 04:33:47 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: सोबत
« Reply #1 on: December 22, 2014, 04:34:15 PM »
Nice Varsh
« Last Edit: December 22, 2014, 04:34:30 PM by MK ADMIN »