Author Topic: उध्वस्त झालेली मने कशी बांधावीत??  (Read 1623 times)

Offline Radha Phulwade

  • Jr. Member
  • **
  • Posts: 63
  • Gender: Female
जीवनातील वादळे ही
नैसर्गिक वादळापेक्षाही
महाभयंकर असतात
अशा वादळाने उध्वस्त झालेली
घरे पुन्हा बांधता येतात
परंतु………………
जीवनातील वादळाने
उध्वस्त झालेली मने कशी बांधावीत??

                                  - राधा

Marathi Kavita : मराठी कविता


कालिंदी

  • Guest
राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी

अमृतवृक्षी फुलला मोहर
कोकिळकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून फुलाफुलांतून
नवलकथा दरवळली

वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्‍तीची ओढ तियेची
नीलजळी थयथयली

अमरप्रीतिचे गीत लाघवी
हरि अधरीची वेणु वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली