Author Topic: तू कोण होतास काय आहेस हे विसरून गेलायस भारताच्या तरूण  (Read 657 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
तू कोण होतास काय आहेस
हे विसरून  गेलायस
भारताच्या तरूण 
तू स्वतःचे सामर्थ विसरून गेलायस

गंगेला पृथ्वीवर आणणा-या
भगिरथाचा तू वंश
रावणाची लंका जाळणा-या
हनुमंताचा तुझ्यात अंश
तुझ्यातील अंशालाच
तू विसरून गेलायस

हिंदवी स्वराज्य  स्थापण करणा -या
शिवरायाचे तुझ्यात रक्त
धर्मासाठी लढणा -या
रामचंद्राचे तुझ्या हाती शस्त्र 
तुझ्या शरीरात वाहणा-या
रक्ताला च तू विसरून गेलायस

हीरा आहेस तू
लाखोत तुझी किम्मत
देशासाठी शहीद झालेल्या
भगतसिंगाची तुझ्यात हिम्मत
तुझ्यामधल्या त्या हिम्मतीलाच
तू विसरून  गेलायस

ज्वालामुखीतून फळफळणारा
तप्त  शिलारसाचा तू लाव्हा
जंगलाचा राजा असलेल्या
सिंहाचा तू छावा
शेळ्यांमध्ये राहून
तू सिंह आहेस हे विसरून  गेलायस


सागरी झेप घेणा-या
सावरकरांच्या बलाचे तुझ्या अंगी वीज
स्वामीजींच्या वाणीमधील
तुझ्या विचारत तेज
तुझ्या अंगात सळसळणा-या
तेजालाच तू विसरून  गेलायस 
Vikas Vilas Dev