उगवत्यास करती प्रणाम सारे
मावळत्यास येथे कोण पुसे
श्रीमंताची होते हाजी - हाजी
गरीबांची ओली डोळे दिसे
अधिका-यास म्हणती बाप
याचकास तुडवी साप जसे
ज्याच्या हाती सत्ता त्याच्या पडती पाया
रंकाची पाहती नुसती तमाशे
सत्ता फिरता स्वतः फिरती
जेथे मालकी त्याच्या पायी वसे
येथे तर चाले हीच रीत
त्याशिवाय येथे जगणे कसे