Author Topic: तु प्रितीचा सुर सखे  (Read 2038 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
तु प्रितीचा सुर सखे
« on: January 14, 2015, 12:32:38 PM »
तु रेशमाची सैल मिठी
तु चांदण्यांची राञ ग ।

ह्रदयात माझ्या पाखरांची
किलबील ही फक्त तूझ्याच साठी ग ।

तु मधुर बरसनारी सर सखे
तु गंधाळनारा सुगंधीत वारा ।

सळसळनारी तु प्रितधारा अन
धुक्यातला तु थंड गारवा ।

तु मंद दिव्याचा प्रकाश सखे
तु कधी न संपनारे चैतन्य ग ।

तु प्रितीचा सुर सखे
तुच मांगल्याचे गीत ग।

तु ओठावरले गीत माझे
तुच ह्रदयाची आर्जव ग ।

दोन तिरावरी दोघे आपण
सळसळनारी ही प्रीत ग ।

तु नित्याची पुजाच माझी
तु अंगणातली माझीया तुळस ग...।

« Last Edit: January 14, 2015, 12:35:44 PM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
Re: तु प्रितीचा सुर सखे
« Reply #1 on: December 21, 2015, 10:47:41 PM »
NICE ONE