Author Topic: दाटले ह्रदय....॥  (Read 1730 times)

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
दाटले ह्रदय....॥
« on: January 18, 2015, 10:19:09 PM »
कवितेचे  नाव:- दाटले ह्रदय....॥
कवी :- वैभव यशवंत जाधव.


का सोडले एकटे मला
नव्हते प्रेम तुझे माझ्यावर,
अजूनही येतात मला कळा
पडले घाव ते मनावर.

बघुनि तुला सोबत कुणाच्या
मनी येई शंका,
पडली प्रेमात तू कुणाच्या
बूडली दर्यात माझी नौका.

प्रेम व्यक्त ठेविले मनी
बोल आता म्हणे कुणी,
भेटले कुणी तुला जिवनी
प्रेम माझे फक्त वाहिले अश्रूंनी.

बघता क्षणी तुला
आठवतो तो भूतकाळ,
अंधाराने भरलेला
आठवतो तो महाकाळ.

असायची तू प्रत्येक स्वप्नात
हसणं-रडणं असतं त्यात,
सोडली तू माझी साथ
स्वप्न आता असतात अंधारात.

होता तो क्षण बोलण्याचा
व्यक्त न झाले माझे मनोदय,
तुला न विचार माझ्या मनाचा
आठवता ते माझे दाटले ह्रदय.....॥

from
V.J.

Marathi Kavita : मराठी कविता