Author Topic: त्या तिथे वळणावर  (Read 1633 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 303
  • Gender: Male
त्या तिथे वळणावर
« on: January 20, 2015, 12:45:40 AM »
"त्या तिथे वळणावर"

तु अशीच गेल्यावर
अश्रू ओघळले गालावर ॥
वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥धृ॥

कशी विसरलीस प्रित
मला काही कळेना ॥
तू छेडलेल्या तारांना
सुर कसे जुळे ना ॥
नजरेत मी येताच
फूले खळी तुज गालावर॥

वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥1॥

उभी दूर अशी तु
परकी नजर जोडीला ॥
काय उपमा द्यावी
अनोळखी तुज खोडीला ॥
अंग चोरून उभी
पांघरून लाज मनावर

वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥2॥

विसरु पाहते मज
लपती तुझी नजर ॥
नकोस करू खंत
फुटल्या दगडा पाझर ॥
नकोस ढाळू अश्रू
मी असताना सरणावर

वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥3॥


यल्लप्पा सटवाजी कोकणे
27/04/2004
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


swati k

  • Guest
Re: त्या तिथे वळणावर
« Reply #1 on: January 22, 2015, 02:01:45 PM »
sundar kavita