Author Topic: डोळे  (Read 1647 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
डोळे
« on: January 24, 2015, 03:58:43 PM »
डोळे ओले झाले माझे
डोळे ओले झाले तुझे
डोळ्यांच्या ह्या सागरातुनी
मन चिंब ओले झाले माझे...

तुझ्या न माझ्या डोळ्यांचे
कसले हे निराळे बंध
तु माझी फूल पाकळी
अन् मी तुझा सुगंध...

तुझ्या नजरेत अवघे
जिवन अवघे वाहून गेले
डोळ्यात तुझ्या बघताना
मन हरवून माझे गेले...

नको मिटू डोळे कधी
न लपवूस डोळे कधी
काय भरवसा डोळ्यांचा
प्राण हरतील डोळे कधी...

तुझ्या डोळ्यातील प्रेम
मला पहायचे आहे
किती प्रेम माझे तुझ्या
नयनी दाटलेले आहे...

नको रानी नको कधी
रूसू तु माझ्यावरी
कारण मी तुझा राजा
अन् तु या राजाची राणी...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता