Author Topic: गुंता  (Read 1009 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
गुंता
« on: January 28, 2015, 11:10:51 AM »
**  गुंता  **


नजरेत तुझ्या काय जाणिले मी
चुकला नकळत हृदयाचा ठोका
तुझ्या मनीचा ठाव कसा घ्यावा
समजत नव्हतं आहे प्रेम की धोकातुझ्या इश्काची इंगळी डसताना
माझ हृदय खुदकन हसायच
तुझ्या मनात खरच काय आहे
मजला कधीच नाही ग समजायचकधीतरी तू बोलावस मनसोक्त
यासाठीच तळमळायच ग माझ मन
तुझ्याच प्रेमात झुरुन झुरुन
विरुन गेलं ग सारं गगनभावनांना माझ्या मिळावी सावली
ठेवून होतो ही एकच आशा
तुज प्रेमप्रवाहातच करपल्या भावना
अन पदरी पडली तिच निराशागुज माझ्या अंतरीचे तुला
कधीच नाही ग उमजल
जिंकून सुद्धा हरलो मी तुझ्या प्रेमात
पण तुला कधीच नाही समजलतुझ्याविना मी कसा जगीन
याचा कधीतरी तू विचार कर
अश्रुंना माझ्या झेल कधी तू
भावनांच तुझ्या खुल दार करजे घडायच ते घडून गेल
चुकल असेल काही तर माफ कर
गैरसमजुतीला प्रेमात नको ठाव
तुही आपल मन साफ कररुसवे फुगवे तर चालतच राहतात
विश्वास माझा सखे तोडू नको
वाईट वेळ आली कितीही
माझा हात सखे तू सोडू नकोपुन्हा भावनांच भरलय आभाळ
तरीही गातो मी विरहाचेच सूर
तुलाही अन मलाही माहीत
जाणार एक दिवस आपण खुप दूरशब्दही कमी पडतात भावना मांडायला
शेवटी एकच कर तू जाता जाता
प्रेम, आठवण, विरह की जीवनभर तुझीच साथ
खरच तू सोडवून जा हा गुंता
            सोडवून जा हा गुंता.......

कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
asswami0143@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता

गुंता
« on: January 28, 2015, 11:10:51 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):