Author Topic: माझ्या ढगांच्या पल्याड  (Read 1012 times)

Offline rickmulik3399

  • Newbie
  • *
  • Posts: 1
माझ्या ढगांच्या पल्याड
« on: January 30, 2015, 01:15:01 PM »
भिजले अंगण
आल्या पावसाच्या सरी
आठवण तिची
पाणी डोळ्यांच्या कपारी

साठवण माझी
स्वप्नातली परी
हरवलेली बाहुली
माझी मलाच ती बरी

पावसाची नजाकत
काहुर जशी इथे
पोहाचावा ओलावा
मन तिचे रिते

माझ्या ढगांच्या पल्याड
तिचे सुकलेले शेत
तिची अन् माझी गुज
                वा-याच्या भरोश्यात

तिची अन् माझी गुज
                वा-याच्या भरोश्यात

IRA

Marathi Kavita : मराठी कविता