Author Topic: पुन्हा हलले किनारे पुन्हा फुलले फुलारे  (Read 1022 times)

Offline Vikkul

  • Newbie
  • *
  • Posts: 3
पुन्हा हलले किनारे पुन्हा फुलले फुलारे
चाहूल तूझीच ही, भुललेत सारे

पुन्हा एक वसंत पुन्हा एक फुल
लाजतेस जेव्हा, झुरतात सारे

पुन्हा तोच चंद्र तेच तारे तेच वारे
आलीस की, निजतात बिचारे

पुन्हा कोकिळा, तिचे तेच गाणे
सतावतोय आवाज तुझा, बोलणारे

पुन्हा एक वार, पुन्हा जार जार
सोसावे कसे, तूझे निखारे

पुन्हा एकदा एक स्वप्न पुन्हा रोमांचिले
निघुन ये सखे, एकदारे