आकाश चांदण्याचे यावे माझ्या कवेत
गंध तुझा येता या मोकळ्या हवेत
पाऊल मंद मंद वाटे मला सुरात
येणे तुझे असे की चाहूल माझ्या उरात
शिल्प भासे मला तुझ्या गुढ दिसण्यात
चमकून वीज जाते तुझ्या शुभ्र हसण्यात
शब्द तुच असतेस मुखी माझ्या बोलण्यात
कळी तुच होतेस फुल माझे फुलण्यात