Author Topic: दिसं आठवितो मी  (Read 1344 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
दिसं आठवितो मी
« on: February 10, 2015, 04:43:10 PM »
त्या ओल्या चिंब पावसाचे दिसं आठवितो मी
तुझ्या संगी सोबतीचे क्षण आठवितो मी
त्या ओल्या चिंब पावसाचे दिसं आठवितो मी
ते तुझे हसणे तुझे लाजणे ते तुझे पावसात भिजणे
हात धरुनी त्या पावसात ते तुझे मलाही खेचणे
त्या पावसाच्या धारा तो थंड गार वारा
कसे विसरू मी दिसं ते तुझ्या संगतीचे
त्या गोळ आठवणींचा साठ आज साठवितो मी
तुझ्या संगी सोबतीचे क्षण आठवितो मी
त्या ओल्या चिंब पावसाचे दिसं आठवितो मी …………

शशिकांत शांडीले (S D), नागपूर

Its patent song......... please don't copy, otherwise some one claim on u. thank u!
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता