Author Topic: मीच ऊरलेला असेल.  (Read 889 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
मीच ऊरलेला असेल.
« on: February 25, 2015, 10:04:32 AM »
का तु मला आवडीयची
माझे मलाच कळत नव्हते
मित्रांच्या दुनियेत मात्र
मन माझे हरवत होते.

सकाळी सोनेरी किरणे
अंगणात माझ्या नाचु लागली,
जणु तुझी चाहुल
मला भासु लागली.

तु ईथे नसतानाही
मन तुझ्याच भोवती फीरत होते,
जणु माझे मन दुनियेत
तुझ्यासाठीच आले होते.

का तुलाही थोड फार कळत नाही
माझ्या प्रश्णांची तुझी उत्तरे
माझ्याकडे वळतच नाही.

असो... एक दिवस असा आलेला असेल,
की तुझ्यासाठी फक्त " मीच उरलेला असेल "
                               " मीच उरलेला असेल "

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
8108919234
« Last Edit: February 25, 2015, 10:31:43 PM by Rohan Rajendra Bhosle »

Marathi Kavita : मराठी कविता