Author Topic: एक मैत्रिण असावी...  (Read 1511 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
एक मैत्रिण असावी...
« on: February 25, 2015, 10:11:09 PM »
एक मैत्रिण असावी...

सगळ काही समजुन घेणारी
आपल्यावर विश्वास ठेवणारी, प्रेम करणारी.
एक मैत्रीण असावी...

आपल्या सुख दु:खात सामील होणारी,
सगळ काही नीट चाल्लय ना विचारणारी.
एक मैत्रीण असावी...

काही कळाले नाही , तर समजुन देणारी,
चुकले तर ओरडणारी, हक्काने ती जाब विचारणारी.
एक मैत्रीण असावी...

तिला कॉल केला नाही तर,
आपल्यावर रुसणारी.
पण काही क्षणात,
हसणारी आणि हसवणारी.
एक मैत्रीण असावी...

आयुष्यभर साथ देणारी
पण, अर्धावट सोडुन न जाणारी
एक मैत्रिण असावी
एक मैत्रिण असावी...!

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
8108919234
« Last Edit: February 25, 2015, 10:27:39 PM by Rohan Rajendra Bhosle »

Marathi Kavita : मराठी कविता