Author Topic: तुझ्यासोबत  (Read 2192 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
तुझ्यासोबत
« on: February 25, 2015, 10:20:25 PM »
तुझ्यासोबत जगण्याची खुप इच्छा आहे,
तुझ्यासोबतच जगण्याला अर्थ आहे.
तुझ्यासोबत जगायला खुप-खुप आवडेल,
तुझ्यासोबतच यशाची पायरी चढायला आवडेल.
तुझ्यासोबत पुर्ण आयुष्य काढावस वाटत,
तुझ्यासोबतच आयुष्यातले क्षण टीपावस वाटत.
तुझ्यासोबत जागेपणी स्वप्णे पाहीन,
तुझ्यासोबतच पाहीलेली स्वप्णे पुर्ण करीन.
तुझ्यासोबत निसर्गाची गाणी गायला आवडेल,
तुझ्यासोबतच गाण्यांना सुर ताल लागेल.
तुझ्यासोबत सुगंधी फुले आज दरवळतील,
तुझ्यासोबतच वेली पाणे आज सळसळतील.
तुझ्यासोबत सुख दु:ख सहन करेन,
तुझ्यासोबतच दु:खांना सुखात रुपांतर करेन.
                 आणि
तुझ्यासोबतच माझ्या जिवनाचा शेवट होईल.

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
8108919234
« Last Edit: February 25, 2015, 10:24:26 PM by Rohan Rajendra Bhosle »

Marathi Kavita : मराठी कविता