Author Topic: एक अनामिक  (Read 669 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
एक अनामिक
« on: February 28, 2015, 04:26:02 PM »
मुक्या भावनात माझ्या , शोर बघितला
ह्रुदयात माझ्या प्रेमाचा, चोर बघितला !

एक अनामिक , आली माझ्या  जीवनात
प्रेम वसंत फुलवीला , माझ्या वेड्या मनात !

ना कधी भेटली ना कधी दिसली
तरीही ही वेडी प्रीत माझी कसली !

माझे मन आता माझे नाही राहिले
मनोमन तिला मी प्रेम फुले वाहिले !

येउन माझ्या स्वप्नी प्रेम मज देऊन गेली
विद्रोही कवीला या प्रेम कवी बनवून गेली !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता