Author Topic: आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती...  (Read 1670 times)

Offline manishshinde

  • Newbie
  • *
  • Posts: 5
आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती,
हातात कॉफीचा मग,
अन् सोबतीला तीचीच आठवणं होती...

कॉफी पितांना,
पावसात भिजणारी "ती" मला भासत होती,
तु पण ये भिजायला,
सारखी खुणावत होती...

पावसाचा प्रत्येक थेंब झेलत,
माझ्याकडे बघत,
मनसोक्त आनंद लुटत होती,
मुद्दाम डबक्यात पाय टाकत,
पाणी माझ्यावर उडवत होती...

भिजायला बोलवण्याचा तिचा प्रयत्न,
मला खुप काही सांगत होता,
आठव पुन्हा तोच पाऊस,
ज्या पावसात तु माझ्यावर आदळला होतास...

तुझ्या थरथरत्या proposeला,
मी आच्छर्यचकीत होउन दिलेला होकार,
आठवतो का रे तुला?,
प्रयत्न तर कर बोलण्याचा,
आपोआप कळतील तुझ्या भावना मला...

मी तरी फक्त मनाशीच म्हणालो,
आठवलं जरी मला,
आठवलं जरी मला,
पण आता त्याचा काय उपयोग होता,
कारण काही वर्षांपूर्वीच,
माझा घास देवाने हिरावुन घेतला होता...
कारण काही वर्षांपूर्वीच,
माझा घास देवाने हिरावुन घेतला होता...

रंगकवी:- मनिष शिंद